Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


संपादकीय
खेळाडूंच्या फिक्‍सिंगमुळे क्रिकेटची विश्‍वासार्हताच धोक्‍यात येते. त्यामुळे केवळ खेळाडूंच्या चौकशीऐवजी व्यवहारांतील संपूर्ण सत्य शोधले पाहिजे. सध्या मोठ्या धूमधडाक्‍यात सुरू असलेल्या "आयपीएल' क्रिकेट सामन्यांमुळे देशभरातील लक्षावधी जनतेचे घरबसल्या मनोरंजन होत असले, तरी एका टीव्ही चॅनेलने या मालिकेतील पाच खेळाडूंच्या विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे करून एका नव्याच वादास तोंड फोडले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 04:15 AM (IST)

व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याविषयीची भूमिका, यावर संबंधित नेत्याचा आवाका, प्रगल्भता आणि उदारता यांचा अंदाज येतो. अशा निकषांच्या आरशात डोकावून पाहिले तर सत्ताधारी नेते कसे दिसतात? दोन घटना. एक आपल्याच देशातली. आपल्या संस्कृतीचा उदारमतवाद सतत गौरवणाऱ्या भारतवर्षातील. तर दुसरी थेट इराणमधील. एका मुस्लिम राष्ट्रातील. आपले कायदेकानू आणि प्रथा-परंपरा याबद्दल अत्यंत कठोर समजल्या जाणाऱ्या आणि बुरसटलेल्या पुराणमतवादी मुस्लिम राष्ट्रातील.

Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)

मार्क्‍सवादी नेते टी. पी. चंद्रशेखरन यांच्या हत्येने राज्यातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातील (सीपीएम) मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेयत्तीनकारा मतदारसंघात दोन जूनला विधानसभेची पोटनिवडणूक होत असून, या मतभेदांचे परिणाम या निकालावर होण्याची शक्‍यता आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आर. सेल्वराज यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिकामी झाली आहे.

Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. वासुदेव गाडे यांची कुलपतींनी नियुक्ती केल्यामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण एकदाचे संपुष्टात आले. नव्या कुलगुरूंची जमेची बाजू म्हणजे त्यांनी पुणे विद्यापीठात जैवतंत्रज्ञान पदव्युत्तर विभागाच्या प्रमुखपदी काम केल्यामुळे त्यांना विविध विभाग, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी या घटकांची बलस्थाने आणि त्यांच्या समस्यांची माहिती आहे.

Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)

येडियुरप्पांनी तूर्त तलवार म्यान केली असली तरी कर्नाटकात "सारे काही आलबेल' असल्याच्या थाटात भाजपला राहता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. कानडी भाषेत एक वाक्‍प्रचार आहे, "तोळ बंत ले तोळ!' त्याचा अर्थ आहे "लांडगा आला रे आला!' लांडगा आल्याची आवई उठवून सर्वांना घाबरवून टाकण्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. ही गोष्ट आज आठवण्याचे कारण एवढेच, की गेले काही दिवस एक "कर-नाटकी' नेता लांडगा आल्याची आवई उठवून भारतीय जनता पक्षाला वेठीस धरत आहे.

Wednesday, May 16, 2012 AT 04:00 AM (IST)

ब्रिटनने दीडशे वर्षे भारतावर राज्य केले होते आज त्याच देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती भारतीय वंशाची आहे. लक्ष्मी मित्तल यांनी या स्थानापर्यंत मजल कशी मारली, त्यावर दृष्टिक्षेप. त्याबरोबरच भारतीय कंपन्या करीत असलेल्या कामगिरीविषयी... "सर्वांत हुशार उद्योगपती कोण?' असा प्रश्‍न विचारला तर त्याची उत्तरे अनेक येतील.पण"जी व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त हुशार असलेल्या माणसांना आपल्या हाताखाली वा सहकारी म्हणून ठेवते' हे त्याचे खरे उत्तर आहे.

Wednesday, May 16, 2012 AT 03:45 AM (IST)

मिस्कील डोळे, गोबरे गाल आणि ताजे टवटवीत हास्य... आय लव यू रसना या आपल्या वाक्‍याने घराघरात पोचलेल्या बालकलाकार तरुणी सचदेव हिचे हे रूप आता पाहायला मिळणार नाही. नियतीच्या क्रूर आघातामुळे तिला अलविदा करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांत तिचाही समावेश आहे. तरुणी आणि तिची आई गीता या दोघींवरही काळानं झडप घातली.

Wednesday, May 16, 2012 AT 03:30 AM (IST)

आर्थिक सुधारणा, जागतिकीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीमुळे परकी कंपन्या, परकी गुंतवणूक व कमी झालेली नियंत्रणे यापुढे भारतीय उद्योग, भारतीय कंपन्या यांचा टिकाव लागेल का, याची चिंता अनेकांना होती. यामुळे 1992 मध्ये काही कंपन्या, उद्योजकांनी एकत्र येऊन या नव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी व आपले हितरक्षण करण्यासाठी बॉम्बे क्‍लबची स्थापना केली होती. यामागे सरकारच्या धोरणांपासून आपले रक्षण करण्यासाठी दबावगट स्थापणे हा उद्देश होता.

Wednesday, May 16, 2012 AT 03:15 AM (IST)

"बॅंकांचा सामान्यांमधील इंटरेस्ट उतरणीला' हा प्रभाकर कुलकर्णी यांचा लेख वाचला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांनुसार त्यांना राष्ट्रीकृत बॅंका मूळ उद्दिष्टांपासून दूर जात आहेत, असे वाटते. परंतु त्यासंबंधीची दुसरी बाजूही विचारात घेतली जावी.   केवळ सरकारी परवान्यांच्या आधारे बॅंकांनी विनातारण 1 लाख कोटी रुपये 122 कंपन्यांना दिले. खरंतर हे परवाने केंद्र सरकारने दिले असल्याने त्या कंपन्यांचे Identification केंद्र सरकारकडून झाले आहे.

Wednesday, May 16, 2012 AT 02:45 AM (IST)

साठीच्या निमित्ताने संसदेतील साऱ्यांनाच आत्मपरीक्षण करण्याची सुबुद्धी सुचली. भारतीय लोकशाही रास्त मार्गाने वाटचाल करीत असल्याची त्यातून प्रचिती आली.

Tuesday, May 15, 2012 AT 03:30 AM (IST)

उत्तम आरोग्य हे आर्थिक विकासाचे साधनच नव्हे, तर ते विकासाचे साध्यही आहे. म्हणूनच समग्र आरोग्यसेवेचा सुस्पष्ट कार्यक्रम आखावा लागेल. असा 'आरोग्य स्वराज्या'चा कार्यक्रमच समृद्ध, निरोगी महाराष्ट्र घडवेल.   'गन्स, जर्म्स अँड स्टील' पुस्तकाचा लेखक जॅरेड डायमंड म्हणतो, की राष्ट्रांचा इतिहास त्यांची शस्त्रक्षमता, आरोग्य व उत्पादक तंत्रज्ञान यांनी घडतो. हे अगदी खरे आहे. आरोग्यदेखील राष्ट्रांचा इतिहास ठरविते.

Tuesday, May 15, 2012 AT 03:00 AM (IST)

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) आमदार मुथूकुमार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पुदुकोट्टई मतदारसंघात 12 जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीवर द्रमुक पक्षाने बहिष्कार घातला आहे. निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. द्रमुकच्या या निर्णयामुळे देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) पक्षाचे अध्यक्ष अभिनेते विजयकांत संभ्रमात पडले आहेत.

Tuesday, May 15, 2012 AT 02:30 AM (IST)

गहू सडतोय हे छायाचित्र (ता. 11) पाहिले. "परमेश्‍वराला यापुढे भारतात अवतार घ्यायचा असेल, तर तो भाकरीच्या रूपानेच घ्यावा लागेल,' असे महात्मा गांधी म्हणत असत. एकीकडे हजारो टन गहू उघड्यावर सडत-कुजत असताना, दुसरीकडे लाखो गोरगरीब बांधव पाणी पिऊन आयुष्य रेटत आहेत. अशाच प्रकारे सरकारी गोदामाबाहेर सडत पडलेले अन्नधान्य दारिद्य्र रेषेखालील लोकांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तसा आदेश दिला होता, त्याला फार काळ झालेला नाही.

Tuesday, May 15, 2012 AT 02:15 AM (IST)

फ्रान्स व ग्रीसमधील निवडणुकांमुळे "युरोझोन'चा पेच आणखी गडद झाला आहे. वास्तववादी व धाडसी उपाय न योजल्यास युरोपची आर्थिक आणि राजकीय आघाडीवरही घसरण होईल. आर्थिक दिवाळखोरीच्या गर्तेतून वाचविण्यासाठी युरोपीय समुदाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व खासगी वित्तपुरवठादार यांच्याकडून मदत घ्यायची आणि त्याच वेळी कठोर आर्थिक शिस्त व काटकसर यांचा अवलंब करायचा, हा समझोता ग्रीसच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारला होता.

Monday, May 14, 2012 AT 04:30 AM (IST)

बदल्यांबाबतच्या धोरणाचा गैरफायदा घेणाऱ्या "झेडपी'च्या धाकट्या गुरुजींवर कारवाई व्हायला हवी आणि कॉलेजातल्या थोरल्या गुरुजींना संप मिटवून काम करायला सांगायला हवं. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या आणि म. फुल्यांच्या पहिल्यावहिल्या शाळेचं नाव सांगणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदापेचात सापडले आहे.

Monday, May 14, 2012 AT 03:45 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: