Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 6
पुणे -  'समाज सध्या अनेक प्रकारच्या दुखण्यांनी त्रस्त झाला आहे. ती दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्‍यक असून त्यासाठी सातत्याने सतर्क आणि गुणवत्तेचा आग्रह धरणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी केले. साप्ताहिक लाल महालतर्फे शिवशाहिरांना "पुण्यरत्न जीवनगौरव पुरस्कार' वनराईचे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरविंद सावंत, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, सतीश जावडेकर या प्रसंगी व्यासपीठावर होते. पुरंदरे म्हणाले, 'सध्या तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य धोक्‍यात आले आहे. चांगल्या सवयी रुजविण्यासाठी सातत्याने तरुणांनी गुणवत्तेचा आग्रह धरायला हवा. आपल्या देशात झालेल्या महापुरुषांनीही वेळोवेळी तोच संदेश दिलेला आहे. समाजाची दुखणी दूर करण्यासाठी तरुणांचा पुढाकार आवश्‍यक आहे.'' धारिया म्हणाले, 'महाराष्ट्राचा इतिहास सर्व देशासमोर मांडण्याचे काम शिवशाहिरांनी केले आहे. समाजासाठी झटताना त्यांनी सदैव विचारांना कृतीची जोड दिली.
Monday, August 23, 2010 AT 10:00 AM (IST)
मुंबई -  डॉ. शालिनीताई वसंतराव पाटील यांच्या "संघर्ष' या आत्मचरित्रातून स्त्री जीवनाचे खरेखुरे दर्शन घडत असून स्त्रियांनी किती अपमान आणि हाल भोगले ते यातून समाजापुढे येत आहे, असे उद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे काढले. शालिनीताईंच्या "संघर्ष- आत्मचरित्र डायरी' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अन्याय भोगणाऱ्या स्त्रियांनी मोठ्या संख्येने आत्मचरित्रे लिहिली, तर दुःखाचे डोंगर उभे राहतील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात शालिनीताईंनी हे पुस्तक लिहिण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. धर्माधिकारी नावाच्या कुणा एका लेखकाने वसंतदादा पाटील यांच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकात माझा एक अक्षरानेही उल्लेख नाही. 25 वर्षे आमचा संसार झाला. त्यापैकी शेवटची दोन वर्षे सोडली तर आमचा संसार दृष्ट लागण्याइतका झाला परंतु दादांच्या चरित्रात माझा उल्लेख नाही. त्यामुळे दादासाहेबांच्या असलेल्या माझ्या नात्याबद्दल संशय निर्माण होतो. विरोधकांनी तो केलाच. अंतुले खटल्यामध्ये या गोष्टीची चर्चा झाली.
Tuesday, August 17, 2010 AT 09:30 AM (IST)
पुणे -  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लोकमान्य सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा पहिला "लोकमान्य मातृभूमी' पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या कार्याद्वारे देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची चेतना जागविणाऱ्या व्यक्तीला यंदापासून या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी आपल्या लेखणी व वाणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगभर पोचविले. त्यांच्या या तपश्‍चर्येला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे, सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 5 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी (ता. 17 ऑगस्ट) रोजी टिळक स्मारक मंदिर येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
Saturday, August 07, 2010 AT 09:45 AM (IST)
मुंबई -  नेपोलियनवर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत मात्र शिवरायांच्या आयुष्यावर उणीपुरी 50 हजार पाने लिहिली गेली नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे व्यक्त केली. शिवरायांचे चरित्र जनतेसमोर ठेवण्यासाठी एक जन्म अपुरा आहे. त्यामुळे देवाने आपल्याला पुढील तीन-चार जन्म शिवचरित्र लिहिण्यासाठी द्यावेत, असे साकडे त्यांनी देवाला घातले. 'स्टार प्रवाह' या लोकप्रिय वाहिनीवरील "राजा शिवछत्रपती' या मालिकेच्या डीव्हीडी प्रकाशनचा सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. शिवशाहीर पुरंदरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते डीव्हीडी प्रकाशित करण्यात आल्या. अर्थमंत्री सुनील तटकरे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी महाराज, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, राजकुमार हिरानी, केतन मेहता, "गांधी माय फादर' चित्रपटाचे निर्माते फिरोज खान आदी व्यासपीठावर होते. श्री. पुरंदरे म्हणाले, 'शिवाजी महाराजांचे कार्य खूप मोठे आहे. आपल्याला अजूनही शिवचरित्राचा अभ्यास करायचा आहे.
Friday, June 25, 2010 AT 09:50 AM (IST)
मुंबई  - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येकाने आपले काम चोख पार पाडले. त्यामुळे भक्कम स्वराज्य उभे राहिले. तसेच आपण आपले काम प्रामाणिकपणे बजावणार असलो तरच शिवरायांचा जयजयकार करण्याचा अधिकार आहे, अन्यथा केवळ उत्सव साजरे करण्याला आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याला काहीच अर्थ राहणार नाही, असे ठाम प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे केले. चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल ऍण्ड फर्टिलायझर्स कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निर्माण केलेल्या मेघडंबरीचे उद्‌घाटन काल (ता.15) शिवशाहीर पुरंदरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय शंकर झा, शिल्पकार अजिक्‍य चौलकर आणि कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तीन हजार 250 किलो वजनाची मेघडंबरी ही किल्ले राययडावरील मेघडंबरीची प्रतिकृती आहे. शिवशाहीर पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतर अजूनही प्रश्‍न सुटलेले नाहीत. स्वराज्याच्या काळात अजूनही आपण रमतो. शिवराज्याभिषेकाचे सोहळे साजरे करतो आहोत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतो.
Thursday, June 17, 2010 AT 09:45 AM (IST)
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: