Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 44
जळगाव -  वाढती महागाई, सरकारी व सार्वजनिक सेवांसह उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटीकरण, उदारीकरण रद्द करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, रिक्त पदे त्वरित भरावीत यांसह विविध मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला होता. यात काही संघटना वगळता इतर संघटनांनी सहभाग घेतल्याने 95 टक्के कर्मचारी संपावर होते. संपामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा, विविध शासकीय कार्यालयांतर्फे नागरिकांना मिळणारी सेवा, टपालसेवा प्रभावित झाली होती. संपामुळे विविध शासकीय कार्यालयांत आज शुकशुकाट होता. कार्यालयांमध्ये अधिकारीच स्वतःच कामे करताना दिसत होते. संपात शासकीय रुग्णालय कर्मचारी व नर्सेस फेडरेशन, मू. जे. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बीएसएनएल कर्मचारी युनियन, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, भारतीय ट्रेड युनियनसह तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, शिक्षक- प्राध्यापक सहभागी झाले होते.   शासकीय रुग्णालय कर्मचारी व नर्सेस फेडरेशनतर्फे काढण्यात आलेली प्रतीकात्मक अंत्ययात्रा.
Wednesday, September 08, 2010 AT 10:00 AM (IST)
रत्नागिरी -  महागाईच्याविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात रत्नागिरी जिल्हा राज्य शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कार्यालयांचे कामकाच ठप्प झाले. संप 85 टक्के यशस्वी झाल्याचा दावा समन्वय समितीने केला. अनेक शासकीय कार्यालयांबाहेर तुरळक गर्दी दिसत होती. रत्नागिरीत सकाळी दहा वाजल्यापासून शासकीय कर्मचारी मोर्चासाठी जमू लागले. अकराच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून घोषणाबाजी करीत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी कर्मचारी नेत्यांनी मार्गदर्शन करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. सभेनंतर जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Wednesday, September 08, 2010 AT 09:45 AM (IST)
तिरुअनंतपुरम -  महागाई व इंधन दरवाढीविरोधात डाव्या पक्षांनी पुकारलेल्या "बंद'ला केरळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद असल्याने जनजीवन विस्कळित झाले. मात्र, राज्यात कोठेही हिंसाचाराचे वृत्त नाही. केरळमध्ये डाव्या आघाडीचेच सरकार आहे. शासकीय कार्यालयातील कामगार संघटनांनी या "बंद'ला अगोदरच पाठिंबा जाहीर केला होता. तुरळक प्रमाणातील खासगी वाहतूक होती. तिरुअनंतपुरमसह राज्यातील मुख्य शहरांत दुकाने, व्यापारीपेठा बंद होत्या. राज्य सरकारची बस वाहतूक व्यवस्था सुरू होती. मात्र, नोकरदार आणि व्यावसायिकांनी "बंद'च्या भीतीने घराबाहेर निघण्याचे टाळल्याने सरकारी बस रिकाम्याच धावत होत्या. रेल्वेस्थानक आणि विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. खासगी वाहने बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
अलिबाग  - महागाईविरोधात देशभरातील 36 कामगार संघटनांनी एकत्र येऊन मंगळवारी "भारत बंद'ची हाक दिली होती. त्याला रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने सरकारी कामकाजासह टपाल सेवेवर परिणाम झाला परंतु बॅंक ऑफ इंडिया वगळता इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे व्यवहार सुरळीत सुरू होते. एस.टी. बस, रिक्षा, मिनिडोअर यांची वाहतूकही नेहमीप्रमाणे सुरू होती. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने या कार्यालयात शुकशुकाट होता. रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. शाळा, महाविद्यालयांमध्ये बंदचा परिणाम दिसला नाही. मंगळवारच्या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला होता. तो इशारा झुगारून कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे सरकार आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
तिरुअनंतपुरम/कोलकता -  महागाईच्या विरोधात देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे सरकारी कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. डाव्या पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांत सर्वाधिक फटका बसला. कोळसा, ऊर्जा क्षेत्रातील कामगारांसह दूरसंचार, बॅंका, विमा, टपाल, बंदर, राज्य परिवहन, पेट्रोलियम या क्षेत्रांतील कामगारही संपात सहभागी झाले होते. "इंटक', "आयटक', "सीटू' यांच्यासह सर्व प्रमुख कामगार संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. बॅंकिंग क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील, तसेच सहकारी क्षेत्रातील बॅंकाही संपात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे बॅंकांचे व्यवहारही थंडावले. संपामुळे प्रमुख विमान कंपन्यांची सुमारे 170 उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र आपल्या सेवेवर संपाचा परिणाम झाला नसल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. किंगफिशर, जेट, जेटलाईट, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्यांच्या सेवेवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. 'सर्व कामगार संघटना संपात सहभागी होण्याचीही ही पहिलीच वेळ होती.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: