Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 45
पुणे -   व्याख्याता पदासाठी आठ ऑगस्टला घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल अद्याप लागलेला नसतानाच पुढील परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. राज्यात "सेट' परीक्षेचे आयोजन करणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या या निर्णयामुळे गेल्या परीक्षेला बसलेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुढील परीक्षेसाठी अर्ज भरावे लागणार आहेत. पुणे विद्यापीठाने चार सप्टेबर रोजी वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करून 12 डिसेंबरला 26 वी सेट परीक्षा घेण्यात येईल, असे जाहीर केले. या परीक्षेसाठी 27 सप्टेबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करायचे आहेत. लेखी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एक ऑक्‍टोबर आहे. आठ ऑगस्टला झालेल्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे की नाही, हे न समजल्याने सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी अर्ज भरावे लागणार आहेत. निकाल न लावताच पुढील परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
Thursday, September 09, 2010 AT 11:30 AM (IST)
नागपूर  -    परीक्षेत कॉपी केली म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्याचे कान उपटले. त्याने केलेला प्रताप पालकांना सांगण्यात आला. त्यामुळे नववीतील या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. शहरातील एका नामवंत शाळेत भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. परंतु, असा प्रकार झालाच नाही, असा दावा शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे. शंकरनगर चौकातील सरस्वती हायस्कूल येथे नववीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात येत होती. तेव्हा करण हा विज्ञान प्रथमचा पेपर सोडवीत असताना काहीतरी संशयास्पद हालचाली करताना शिक्षिकेला दिसला. त्यांनी करणची तपासणी केली. त्याच्याजवळ कागदाचे काही चिटोरे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने त्याला रागावले. नंतर त्याच्या पालकांना फोन करून शाळेत बोलावून घेतले. त्याचे पालक शाळेत आल्यावर शिक्षिकेने करणने केलेला प्रकार सांगितला. शाळा अतिशय प्रतिष्ठित आहे. त्यामुळे अशाप्रकारचे वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याला काढण्यात येते, असे शिक्षिकेने म्हटले.
Saturday, September 04, 2010 AT 09:30 AM (IST)
अमरावती  -  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विद्याशाखेतर्फे घेण्यात आलेल्या मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्सच्या प्रात्यक्षिक परीक्षेत एकच परीक्षक अकोला आणि अमरावतीत नेमण्यात आल्याने परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार एमसीएच्या विद्यार्थ्याने परीक्षा नियंत्रकाकडे केली आहे. विद्यापीठातर्फे एमसीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षकाने प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थित न राहता कोऱ्या ग्रीन आणि ब्लॅक कंट्रोल शीटवर स्वाक्षऱ्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कोऱ्या शीट तक्रारीसोबत जोडण्यात आल्या आहेत. ज्या दिवशी एमसीएची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली, त्याच दिवशी हेच परीक्षक अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात एम.एस्सी. परीक्षेसाठी बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते. तशी नोंददेखील विद्यापीठात असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. याच प्रकाराची पुनरावृत्ती परत झाली आहे.
Saturday, September 04, 2010 AT 09:30 AM (IST)
मुंबई  -  "एलएलएम'च्या "आयपीआर' अभ्यासक्रमातील "ट्रेडमार्क' विषयाची परीक्षा देऊनही 15 विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण करण्याचा अजब कारभार मुंबई विद्यापीठाने केला होता. या संदर्भात "सकाळ'मध्ये बातमी प्रकाशित होताच सिनेटच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले होते. यावर तातडीने पावले उचलून परीक्षा विभाग कामाला लागला होता. या विभागाने गैरहजर विद्यार्थ्यांना पत्र पाठवून, ते प्रत्येक विषयात उत्तीर्ण झाल्याचे कळविले आहे. यामुळे ट्रेडमार्क विषयाच्या विद्यार्थ्यांनी "सकाळ'चे आभार मानले आहेत.
Thursday, September 02, 2010 AT 09:35 AM (IST)
'यूपीएससीने तयार केलेल्या माहिती पत्रकात असे स्पष्टपणे नमूद केले आहे, की यूपीएससी परीक्षेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या समतुल्य असेल. त्यामुळे पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना फारसा अधिकचा अभ्यास न करता यू.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होणे सहज शक्‍य व्हावे, अशी अपेक्षा आहे.' दर्जा उंचावणे गरजेचे मागील काही वर्षांचा असा अनुभव आहे की महाराष्ट्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार कमीत कमी एक ते दोन वर्षे अधिकची विशेष तयारी केल्याशिवाय यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची पदवी प्राप्त केलेले बहुतेक उमेदवार आपल्या पदवी परीक्षेच्या विषयाची निवड न करता कला शाखेच्या विषयांची निवड करतात. यावरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांच्या शिक्षणांचा दर्जा अपेक्षेपेक्षा बराच कमी आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात सर्वच विषयांचे बाबतीत पदवी परीक्षेच्या शिक्षणाचा दर्जा अपेक्षेपेक्षा बराच कमी आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या बहुतेक संस्था खासगी क्षेत्रातील आहेत.
Wednesday, September 01, 2010 AT 10:43 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: