Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 254
गडचिरोली -  जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक मार्गांची वाहतूक बुधवारीही (ता. आठ) ठप्प होती. गडचिरोली तालुक्‍यात राजोली येथे पुराचे पाणी शिरल्याने शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून सततच्या पावसामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. दरम्यान, भामरागडजवळील पर्लकोटा नदीला पूर आल्याने या मार्गाची वाहतूक बुधवारी तिसऱ्या दिवशीही बंद होती. जिल्ह्यात सर्वदूर मंगळवार रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळित झाले. पुराचा भामरागड येथील नागरिकांनी प्रचंड धसका घेतला आहे. शहराच्या सभोवती असलेल्या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, मुलचेरा, कुरखेडा व अहेरी तालुक्‍यांत पाऊस सुरू होता. दुपारी काही तालुक्‍यांत पावसाने उसंत दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वीज व दूरध्वनिसेवा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
Thursday, September 09, 2010 AT 09:30 AM (IST)
गडचिरोली -  आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्यात वाहून गेले. या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने तीन ते चार महिने रस्त्याच्या डागडुजीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यात गडचिरोली शहरासह दुर्गम भागात पंतप्रधान ग्रामसडक योजना, आमदार, खासदार निधी, जिल्हापरिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका व रस्ते सीमा संघटनेमार्फत रस्त्याचे काम करण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रत्यय यंदाच्या पावसाळ्यात दिसून येत आहे. पाच-सहा महिन्यांपूर्वी अनेक ठिकाणी सिमेंट व खडीकरण करण्यात आलेले रस्ते व पूल पुरात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
Tuesday, September 07, 2010 AT 09:30 AM (IST)
वानाडोंगरी -  हिंगणा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचाराकरिता येतात परंतु त्यांना अलीकडे वेळेवर उपचार मिळण्याऐवजी ताटकळत राहावे लागते. दरम्यान या केंद्रात एका अधिकाऱ्यामागे अधिकचा व्याप असून त्याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होऊ लागला आहे. नीलडोह, डिगडोह, खैरी पन्नासे, मोहगाव, हिंगणा, रायपूर या ग्रामपंचायतअंतर्गत परिसरातील लोकसंख्या दीड लाखांच्या जवळपास आहे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत आहे. वैद्यकीय अधिकारी श्री. भुजाडे हे नेहमीच सकाळी आठपासून ते दुपारी तीनपर्यंत रुग्णतपासणी करून आवश्‍यक तो औषधपुरवठा करतात. त्यातच रात्रीबेरात्री रुग्ण उपचाराकरिता आल्यास त्यांच्यावरही ते उपचार करीत असल्यामुळे पुन्हा एका अधिकाऱ्याची मागणी करण्यात येत आहे. हिंगणा तालुक्‍याच्या ग्रामीण तसेच विशेषतः एमआयडीसी परिसरातील लोकांना हे रुग्णालय आरोग्यसुविधेसाठी सोयीचे पडते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्यकेंद्रात येऊन सेवा घेतात. वेळेवर डॉक्‍टर व रुग्णसेवा उपलब्ध होत असल्याने या केंद्राने रुग्णांचा विश्‍वास संपादन केला.
Tuesday, September 07, 2010 AT 09:30 AM (IST)
गडचिरोली -  राज्य माहिती आयोगाचे नागपूर येथील माहिती आयुक्त व गडचिरोली जिल्हापरिषदेच्या नियमबाह्य प्रशासकीय कार्यवाहीला चपराक देत उच्च न्यायालयाने शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांच्यावरील दंडवसुलीला स्थगनादेश दिला. गडचिरोली पंचायत समितीचे शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या अधिनियमानुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीच संधी विनानोटीस संपूर्ण प्रकरणात दिली नसल्याचे न्यायालयाने या निर्णयात नमूद केले आहे.
Tuesday, September 07, 2010 AT 09:30 AM (IST)
कुरखेडा -  महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेली कामे गरजूंना मागणीनुसार उपलब्ध करून द्यावे असे निर्देश आमदार आनंदराव गेडाम यांनी दिले. स्थानिक तहसील कार्यालयात विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीला पंचायत समितीचे सभापती प्रभाकर तुलावी, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष व्यंकटी नागिलवार, वसंतराव मेश्राम, नवनाथ धाबेकर, तहसीलदार भारद्वाज, संवर्ग विकास अधिकारी बी. एम. नरोटे, पंचायत समिती सदस्य धरमदास उईके उपस्थित होते. श्री. गेडाम पुढे म्हणाले की, तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रोहयो कामांना मान्यता मिळून आवश्‍यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, यापैकी काही कामे तांत्रिक अडचण आणि अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अपूर्ण आहेत, तर काही सुरू होऊ शकली नाही. या कामांकडे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष पुरवून कामांना गती प्रदान करावी, योजनेंतर्गत मागणी करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण मजुरांना रोजगार व क्षेत्राचा विकासासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे असे आवाहन आमदार गेडाम यांनी केले.
Tuesday, September 07, 2010 AT 09:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: