Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 883
खडकी - बोपोडी, पुणे-मुंबई रस्ता या भागामध्ये डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या भागातील अनेक नागरिक या आजारामुळे त्रस्त आहेत. या भागातील काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही या आजाराने ग्रासले असल्याची माहिती समोर आली आहे. बोपोडीत गेल्या महिनाभरात डेंगी, मलेरिया व चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाभाविकच डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे गेल्या महिनाभरापासून या भागातील सर्व रुग्णालये व औषधविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, काही डॉक्‍टर व औषध विक्रेत्यांनाही डेंगी व चिकुनगुनियाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
Thursday, September 09, 2010 AT 11:30 AM (IST)
नागपूर -  इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे डिप्टी सिग्नल झोपडपट्टीतील आठ वर्षांच्या संध्याचा हात कापण्याची वेळ आली. मेयोतील ढिसाळ उपचाराचा हा उत्तम नमुनाच असल्याची भावना व्यक्त होत आहे. मेयोतील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये मागील महिन्याभरापासून शोभा आणि संताराम खुटी यांची आठ वर्षांची मुलगी संध्या भरती आहे. आठ ऑगस्ट रोजी ती घराजवळ खेळत असताना बाजूला असलेल्या विद्युत जनित्राच्या तारेने तिचा हात भाजला. मेयोत उपचारासाठी आणले. तत्काळ तिला भरती केले. सुरवातीला सलाईन लावले परंतु पुढे संध्यावर उपचार करण्याऐवजी प्रयोग करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर येत असते परंतु उपचार करीत नव्हते. मागील पंधरा दिवसांत संध्याच्या भाजलेल्या हातावर कोणीही उपचार केले नसल्याची तक्रार संध्याच्या आईवडिलांनी केली. संध्याच्या हातावर योग्य उपचार न झाल्यामुळे हातामध्ये जंतुसंसर्ग झाला. जंतुसंसर्ग प्रचंड वाढला. यामुळे संध्याच्या हाताला झालेल्या जखमेतून जंत बाहेर येत होते.
Thursday, September 09, 2010 AT 09:41 AM (IST)
नागपूर -  जनजागृती वाढू लागल्याने आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण नागपूर विभागात दरवर्षी सरासरी 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढत असून, सध्या 30 टक्के नागरिकांकडे आरोग्य विमा असल्याची माहिती आहे. धावपळीच्या युगात तरुण वयात युवकांना विविध आजार होऊ लागले असल्याने आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विमा काढण्यात येत आहे. तसेच विमा कंपन्यांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सामान्य विमा आणि आयुर्विमा असे दोन प्रकार आरोग्य विम्यात आहेत. त्यात सामान्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, ओरिएन्टल इन्शुरन्स आणि नॅशनल इन्शुरन्स या चार कंपन्या सामान्य विमा काढतात. आयुर्विमामध्ये आयुर्विमा महामंडळ, रिलायन्स इन्शुरन्स, एचडीएफसी स्टॅन्डर्ड लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेंशियल, कोटक महिंद्रा, टाटा एआयजी, बिर्ला आणि बजाज अलायन्ससह 10 ते 12 कंपन्यांचा समावेश आहे. सामान्य विम्यामध्ये विमाधारकाला झालेल्या संपूर्ण खर्चाचा परतावा मिळतो. कमीतकमी एका लाखाचा विमा असल्यास विम्याच्या एक टक्का रक्कम ही विमाधारकाला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मिळते.
Thursday, September 09, 2010 AT 09:30 AM (IST)
अमरावती -  येथील सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत दशरथ खडसे यांची सात वर्षांची मुलगी रेवती थेलेसेमिया आजाराने ग्रस्त असून, तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. रेवतीला जन्मापासूनच थेलेसेमियाची लागण झाली असून, दहा महिन्यांनंतर या आजाराचे निदान झाले. तिच्यावर अमरावती येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव बूब यांच्याकडे उपचार करण्यात आले असून, दर 15 दिवसांनी रेवतीला रक्त दिले जाते. मात्र, प्रकृती खालावल्याने तिला चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासाठी 10 लाख रुपयांची गरज असून, समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदत करण्याची आवश्‍यकता आहे. रेवतीवर स्टेम सेल ट्रान्सप्लॅंटेशन केल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. या साठी 10 लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. हा खर्च रेवतीच्या पित्याला झेपावणार नसल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी अपोलो स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खाते क्रमांक "रेवती-177724' येथे पैसे जमा करावे, असे आवाहन रेवतीवर उपचार करणाऱ्या डॉ. रेवथी राज तसेच तिचे वडील चंद्रकांत खडसे यांनी केले आहे.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
राजापूर -  गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात मलेरिया वा स्वाइन फ्लूच्या साथीचा फैलाव होऊ नये, यासाठी पंचायत समितीचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. या काळात मुंबई किंवा अन्य ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी तपासणी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. गणशोत्सव तोंडावर आलेला असताना मलेरिया आणि स्वाइन फ्लूच्या साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. या साथींचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी तालुक्‍यात येतात. या साथीचा प्रादुर्भाव झालेला एखादा रुग्ण तालुक्‍यात आल्यास त्याचा फैलाव होण्याची अधिक शक्‍यता आहे. याबाबत आरोग्य विभागाने दक्षता बाळगली असून त्याला तोंड देण्यासाठी नियोजनही केले आहे. आरोग्य विभागामार्फत तालुक्‍यात नुकतीच खासगी डॉक्‍टरांची या साथीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. या डॉक्‍टरांनाही या साथींबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्‍यात गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी चार तपासणी पथके 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहेत.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: