Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 5175
नवी मुंबई -   नवी मुबंईतील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका गणेशोत्सवापूर्वी होतील, असे संकेत "मातोश्री'वरूनच मिळाले होते मात्र गणेशोत्सव आला, तरी नेमणुकांबाबत काहीच हालचाली होत नसल्याने शिवसैनिकांची प्रतीक्षा कायम आहे.   लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान नाराजांनी शिवसेनेला राम-राम ठोकला आहे. यात अनेक निष्ठावंतांचा समावेश आहे. यामुळे नवी मुंबई शिवसेनेतील अनेक पदे आजपर्यंत रिक्तच आहेत. यात उपजिल्हाप्रमुख, शहप्रमुख आणि उपशहरप्रमुखांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रमुख पदांबरोबर नवीन सभासद कार्यकारिणीची घोषणाही ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात होणार होती मात्र महिना उलटला तरी ती झाली नाही. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या अगोदर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर होण्याची दाट शक्‍यता होती मात्र आता ती शक्‍यताही संपली आहे. या नेमणुकीत वरिष्ठ शिवसैनिकांना प्राधान्य देण्याची शक्‍यता आहे मात्र सोडून गेलेल्या शिवसैनिकांचा फेरविचार होणार नसल्याची खात्री सर्वांना वाटत आहे. वरिष्ठ पातळीवर मतभेद असल्याने नव्या नेमणुकांची यादी प्रसिद्ध होत नसल्याची माहिती एका शिवसैनिकाने दिली.
Saturday, September 11, 2010 AT 10:25 AM (IST)
ठाणे  -  शंभर वर्षांनी रमजान ईद आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत. एकीकडे अमेरिकेत ख्रिश्‍चन धर्मगुरू कुराण जाळण्याची भाषा करीत असतानाच ठाण्यातील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमांतून सर्वधर्मसमभावाचा संदेश पोचविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्‍चन पिढीतील तरुण पिढीचे नेतृत्व करणारे युवक शनिवारी (ता. 11) ठाणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. युवकांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमाविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मिस अमेरिका डायना पिंटो उपस्थित होते. नजीब मुल्ला, डायना पिंटो, मिलिंद पाटील आणि शीख धर्मातील एका युवक उद्या दुपारी ठाण्यात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. शहरातील कौपिनेश्‍वर मंदिर, गणेश मंदिर, राबोडी आदी परिसरातील मशिदी, सेंट जॉन चर्च, सर्व्हिस रोडवरील गुरुद्वारा आदी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. डायना पिंटो हिने सांगितले की, कोणत्याही धर्माच्या ग्रंथाबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.
Saturday, September 11, 2010 AT 10:23 AM (IST)
मुंबई - मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांनीच पुणे जर्मन बेकरी स्फोटाच्या कटातील दहशतवादी शेखलाल बाबा ऊर्फ बिलाल याला प्रशिक्षण दिल्याची माहिती पुढे आली आहे. बिलालला दहशतवादी प्रशिक्षणाकरिता पाकिस्तानमध्ये पाठविणारा हिमायत बेग हा लष्कर ए तैयबासोबतच आयएसआयच्याही संपर्कात होता. मात्र, मुंबई हल्ल्याच्या कटाबाबत त्याला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा एटीएसमधील सूत्रांनी केला आहे. कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिमायत बेग आणि शेखलाल बाबा ऊर्फ बिलाल यांची एटीएसच्या पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. जानेवारी 2008 ते जानेवारी 2010 दरम्यान बिलाल याने पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण पूर्ण केले. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी लाहोर आणि मुझफ्फराबाद येथे घातपाती कारवायांचे तसेच लष्करी प्रशिक्षण घेतले होते. याची कबुली या हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याने दिलेली आहे.
Saturday, September 11, 2010 AT 10:13 AM (IST)
नितीन चव्हाण  - सकाळ वृत्तसेवा मुंबई -   मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवामुळे ऍड्‌. आशीष शेलार यांनी पालिकेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने नवीन गटनेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नगरसेवक भालचंद्र शिरसाट आणि योगेश सागर यांना पुन्हा संधी देणार की शेलार यांचेच मन वळवून गटनेतेपदाचा वाद भाजपचे मुंबईचे नवीन अध्यक्ष मिटविणार, असाही एक प्रवाह चर्चेत आहे. राज पुरोहित यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परंपरेप्रमाणे मुंबई भाजपच्या जुन्या कार्यकारिणीने आपल्या पदाचे राजीनामे नूतन अध्यक्षांकडे दिले आहेत. कार्यकारिणीपाठोपाठ ऍड. आशीष शेलार यांनीही पालिकेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. यापूर्वी कार्यकारिणी बदलल्यानंतर पालिकेतील गटनेत्याने पदाचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात नसल्याचे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षीय पातळीवरील पदाधिकारी आणि पालिकेतील गटनेतेपदाचा काडीचाही संबंध नसताना शेलार यांचा राजीनामा म्हणजे त्यांची नाराजी असल्याचे म्हटले जाते. भाजपचे महापालिकेत 29 नगरसेवक आहेत. त्यामध्ये सभागृहात बोलणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत.
Saturday, September 11, 2010 AT 10:08 AM (IST)
मुंबई  -  मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या संजय गावकरची अचानक दृष्टी गेली. त्याच्यासमोर सारा अंधार दाटला. मात्र, त्याने जिद्द सोडली नाही. मुख्यमंत्री व तत्कालीन उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीने त्याच्या अंधकारमय आयुष्यात आशेचा किरण लुकलुकला. चव्हाण यांनी केलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून संजयने एक कारखाना उभा केला, स्वतः चाचपडण्याची वेळ आलेल्या अनेक तरुणांना त्याने आधार दिला, त्याच्या या जिद्दीचे व यशाचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून कौतुक केले आहे. राज्यात ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या संजय हरिहर गावकरने इंजिनीअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर 2004 मध्ये सिद्धकला इंजिनीअरिंग वर्क्‍स नावाची कंपनी सुरू केली. परंतु "रेटिना' नावाच्या आजारामुळे त्याची दृष्टी गेली आणि त्याचे भवितव्य अंधकारमय झाले. परंतु, त्याने हिंमत सोडली नाही. श्री. चव्हाण यांची उद्योगमंत्री असताना संजयने भेट घेतली व आपणास कारखाना सुरू करायचा आहे, त्यासाठी त्यांच्याकडे जागा मागितली. चव्हाण यांनी त्याची जिद्द पाहून नवी मुंबईत एमआयडीसीमधील 100 चौरस मीटरचा एक भूखंड मंजूर करून दिला.
Saturday, September 11, 2010 AT 10:05 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: