Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 3
हैदराबाद  -  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह संघ परिवारातील काही वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली "लष्करे-तय्यबा'शी संबंधित दहशतवादी विकरुद्दीन अहमद याने दिली आहे. येथील पोलिसांनी त्याला सिकंदराबादमधून दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. "सिमी'चा कार्यकर्ता असलेला विकरुद्दीन या नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी दोन वर्षे अहमदाबादमध्ये राहिल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याचा कबुलीजबाब आज येथील न्यायालयात सादर केला. तेहरिक गलबी-इस्लाम (टीजीआय) या नावाने विकरुद्दीनने गुजरातमध्ये संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्याने संपूर्ण गुजरातमध्ये आपले जाळे बनविले होते. 2006 नंतर त्याने नरेंद्र मोदींना दोनदा लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन्ही वेळा पुरेशा शस्त्रांअभावी विकरुद्दीनचे प्रयत्न फसले होते. गुजरातमधील गोधरा दंगलीनंतर झालेल्या मुस्लिमांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी मोदींची हत्या करण्याचा कट आपण आखला होता, अशी कबुली विकरुद्दीनने दिली आहे. विकरुद्दीनचा ताबा मिळविण्यासाठी गुजरात पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक येथे दाखल झाले आहे.
Sunday, July 18, 2010 AT 10:00 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांचे मक्का मशिदीत झालेल्या बॉंबस्फोटातील संशयितांशी कथित संबंध असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हा प्रकार म्हणजे आपली आणि आपल्या संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया इंद्रेश कुमार यांनी आज दिली. राष्ट्रवादी शक्तींची निंदानालस्ती करण्यासाठी सुनियोजित राजकीय कटाचा हा एक भाग आहे असे त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. " हिंसाचार आपल्याला अजिबात मान्य नाही, त्यामुळे बॉंबस्फोटातील संशयितांशी आपले संबंध असल्याच्या बदनामीकारक वृत्ताचा आपण तीव्र निषेध करत आहोत. राष्ट्रवाद्यांची आणि देशभक्‍तांची निंदानालस्ती करण्यासाठी असत्यावर आधारेल्या एका योजनाबद्ध राजकीय कटाचा हा एक भाग आहे,'' असे इंद्रेश कुमार यांनी या पत्रात म्हटले आहे. काही हिंसक घटनांशी आपला आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याची, काही वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केलेली बातमी समाजात गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूनेच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रा.स्व.
Sunday, July 18, 2010 AT 04:12 AM (IST)
मुंबई  - बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांच्या बनावट व्हीसीडी आणि डीव्हीडींची विक्री होत असल्याने निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यावर पोलिसांनी जाळे टाकले असले तरी त्यात लहान मासेच गळाला लागत आहेत. पायरसीची पाळेमुळे खोलवर रुजल्याने या उद्योगातील मोठे मासे अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे हे रॅकेट उद्‌ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी साडेपाच कोटी रुपयांच्या बनावट सीडी आणि डीव्हीडी जप्त करून 50हून अधिक जणांना अटक केली आहे. परंतु या कारवाईत मुख्य सूत्रधार मोकळेच राहत आहेत. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले चित्रपट चित्रपटगृहात लागण्यापूर्वीच त्यांच्या सीडी आणि डीव्हीडी अवघ्या 30 रुपयांत मुंबईतील रस्त्यांवर राजरोसपणे विकल्या जात आहेत. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील गर्दीची स्थानके तसेच पादचारी पुलांवर या व्हीसीडी आणि डीव्हीडींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
Tuesday, May 11, 2010 AT 10:00 AM (IST)
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: