Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 1
पुणे -  पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत इतिहासाबद्दल आपल्याकडे फारच अनास्था आहे. वास्तविक इतिहास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, केवळ पैशाअभावी हे काम मागे पडू नये, अशी अपेक्षा "सकाळ'चे अध्यक्ष व भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दी समितीचे उपाध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंडळाचे चिटणीस डॉ. श्री. मा. भावे, सदस्य डॉ. राजा दीक्षित या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले, 'पाश्‍चात्त्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व आस्था जाणवते. इतिहासाचे जतन करून ठेवण्याची परंपरा त्यांच्याकडे आहे. ती परंपरा आपल्याकडे अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होण्याची गरज आहे.'' भारत इतिहास संशोधन मंडळाविषयी बोलताना ते म्हणाले, 'आयुष्य समर्पित करणाऱ्या त्यागी लोकांमुळेच भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या संस्था मोठी परंपरा निर्माण करू शकल्या आहेत. ध्येयवादी लोकांमुळेच अशा संस्थांचे काम पुढे गेले आहे. अशा काही मोजक्‍याच संस्था पुण्यात आहेत.'' डॉ.
Wednesday, July 07, 2010 AT 10:15 AM (IST)
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: