Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 23
  अभिनेता संदीप कुलकर्णी सध्या करतोय काय? "श्‍वास', "डोंबिवली फास्ट', "गैर'... संदीपनं नेहमीच आपल्या जबरदस्त व्यक्तिरेखांद्वारे आपल्याला आनंद दिलाय. आता तो सज्ज झालाय आणखी एक जबरदस्त आव्हान स्वीकारण्यासाठी. गेल्या काही महिन्यांपासून संदीपबरोबर "वन डे'चा योग जुळून येत नव्हता. या वेळी तो आला पण थोड्या तासांचा फेरफार करून. अर्थात, या बदलामुळे या कलावंताचं एक वेगळं "शेड्यूल' पाहायला मिळालं आणि त्याच्या भूमिकांमागचा वेगळा विचारही विलक्षण भावून गेला.   संदीपचा 'डे-नाईट' संचार दुपारी 2 ते 3.30 - दिवसाला सुरुवात झाली. साडेतीनला "प्रीमियर टीम' येणार असल्यानं त्याआधी तयार होणं गरजेचं होतं. 3.30 ते 4.30 - "प्रीमियर टीम'सोबत गप्पा आणि फोटोशूट. 4.45 ते 5.15 - ट्रॅफिकमुळे बराच वेळ लागत होता. मीटिंगची वेळ केव्हाच टळली होती. शेवटी सव्वापाचला पोचलो. 5.30 ते 6.10 - निर्माता अतुल पांडेसोबत मीटिंग झाली, त्यात नव्या सिनेमाविषयी चर्चा झाली. 6.30 ते 8.30 - साडेसहाला सेटवर पोचलो. मेकअप करून साधारण पावणेआठला तयार झालो. शूटिंग सुरू व्हायला साडेआठ वाजले. 8.30 ते 11 - रात्री अकरा वाजता जेवलो.
Thursday, September 09, 2010 AT 04:57 AM (IST)
आपल्या कामावर निरातिशय "प्रेम' केल्यानंच प्रेम चोप्रा अजूनही तेवढ्याच जोमानं कार्यरत आहेत. या अभिनेत्याचे पहिले तीन चित्रपट प्रदर्शित होऊन चक्क पन्नास वर्षं होताहेत. त्यातला एक होता पंजाबी चित्रपट! सुपरहिट ठरलेला "चौधरी कर्नाल सिंग' आणि हिंदी होते - "मुड मुड के ना देख' नि "हम हिंदुस्थानी'! प्रदर्शनाचं वर्ष होतं 1960. त्यांनी त्यांच्या पत्नीच्या पुतण्याप्रमाणं (राज कपूर यांची भगिनी) म्हणजेच ऋषी कपूरप्रमाणं राष्ट्रीय पुरस्कार पटकावला - तोही पहिल्या वहिल्याच चित्रपटासाठी- तोही नायकाच्या भूमिका करून! आपल्या 50 वर्षांच्या "करिअर'ला त्यांनी दिलेला हा उजाळा. अजूनही कार्यमग्न - खासियत असणाऱ्या खलनायकाच्या कंटाळवाण्या नि लंपट भूमिका प्रेम चोप्रांना पडद्यावर साकाराव्या लागत आहेत. आजघडीला त्यांनी जवळपास 400 चित्रपटांत काम केलं असून अद्यापही ते सतत कार्यव्यस्त असतात. त्यांनी केवळ खलनायक एके खलनायक न साकारता वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. खलनायकानं गायकाच्या गाण्यावर निव्वळ "लिप मूव्हमेंट' करणं आणि अनुषंगिक नृत्य करणं हे सहज घडणारं नाही.
Thursday, September 09, 2010 AT 04:44 AM (IST)
"उत्तरायण', "एवढंसं आभाळ', "कॉर्पोरेट', "फॅशन', "नटरंग' आणि आता "दबंग'.... बॉलीवूडमध्ये गाजत असलेलं सध्याचं मराठी नाव म्हणजे कॅमेरामन महेश लिमये. गेल्या 15 वर्षांपासून महेश जाहिरात क्षेत्रात वावरतो आहे पण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये त्याच्यातील गुणवत्तेची कल्पना बॉलीवूडला आली आहे. महेशचं "लेटेस्ट' छायाचित्रण असलेला "दबंग' चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होतोय. त्यानिमित्तानं महेशशी केलेली ही चर्चा. जाहिरात क्षेत्रात सुरुवातीला काम करून कालांतरानं चित्रपट माध्यमाकडे वळण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. तुझं या क्षेत्रात आगमन त्याच पद्धतीनं झालं का ? - सायन्स, कॉमर्स क्षेत्रात मला फारशी गती नसल्यामुळे मी दहावीनंतरच कला क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आई-वडिलांनीही त्याला पाठिंबा दिला. "जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌'मधून मी पदवी घेतली. ऑईल पेंटिंगमध्ये पुढं जाण्याची संधी असतानाही मला फोटोग्राफीनं भुरळ घातली होती. याच सुमारास एमटीव्हीचं आगमन झालं होतं. या काळात मी अख्खा दिवसभर म्युझिक व्हिडीओ पाहत बसायचो. छाया-दिग्दर्शनाचं तंत्र तेव्हापासून माझ्या डोक्‍यात घुसलं होतं.
Thursday, September 09, 2010 AT 04:24 AM (IST)
गेल्या ऑगस्टमध्ये "ती रात्र' हा चित्रपट आणि त्यातील संतोष जुवेकर, आदिती सारंगधर यांच्या भूमिका हा लोकांच्या चर्चेचा विषय ठरला. संतोष आणि अदिती यांच्या भेटीचा योग 'प्रीमियर'नेही जुळवून आणला. तो दिवस होता 15 ऑगस्टचा. आपल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा. दोघांनीही खास "माय रीलिजन-भारतीय' असा संदेश असणारे पांढरे टी शर्ट घातले होते. पार्ल्याला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर त्यांची गप्पांची मैफल रंगली. मध्येच अनेक चाहते संतोष आणि अदितीच्या कामाचं कौतुक करूनही गेले. दोघांच्या गप्पांतून खूप वेगळे मुद्दे समोर आले.   "काही वर्षांनी राजकारणात जाणार !' 1) संतोष - "रुईयाइट्‌स' (रुईया कॉलेजचे विद्यार्थी) स्वत-ला रंगकर्मी वगैरे म्हणवतात. तूसुद्धा रुईयाचीच. तुझ्याबाबतीत हा नाटकाचा किडा नेमका कुठून आला? आदिती - संत्या, "रुईया'त ऍडमिशन घेतली तेव्हा नाटकाशी माझा काडीचाही संबंध नव्हता. "चाइल्ड सायकॉलॉजिस्ट' व्हायचं या हेतूने मी रुईया कॉलेजला ऍडमिशन घेतली होती पण "रुईया'च्या "नाट्यवलया'नं मात्र खरंच वेड लावलं. नाटकाचा तो किडा डोक्‍यात शिरला, की एक वेगळीच नशा चढते.
Thursday, September 09, 2010 AT 04:08 AM (IST)
'हे ड्यूडस्‌, कम ऑन...' असं म्हणत प्रियांका चोप्राचं आता छोट्या पडद्यावर आगमन होतंय. "फिअर फॅक्‍टर खतरों के खिलाडी एक्‍स 3' या "कलर्स' वाहिनीवरील "शो'मध्ये ती तेरा जणांना घाबरविणार आहे, थोडासा धीर देणार आहे आणि हसतखेळत हा "शो' पुढं नेणार आहे. या शोचं नाव ऐकल्यावर तुमच्या "मेमरी'त अक्षयकुमारचं नाव "क्‍लिक' होणं अगदी साहजिकच आहे. म्हणूनच त्याची जागा प्रियांका कशी घेतेय, याची तुम्हालाही उत्सुकता असेल. या "शो'च्या निमित्तानं प्रियांका चोप्राशी मारलेल्या या गप्पा...   "फिअर फॅक्‍टर खतरों के खिलाडी एक्‍स 3' या "शो'च्या सूत्रसंचालनाची तयारी तू कशी केलीयस ? - मी प्रचंड आळशी मुलगी आहे, हे आधी कबूल करायला हवं. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तुम्ही मला ओळखताय. माझी फिटनेस लेव्हल "ऍक्‍च्युली झिरो' आहे. खरं तर या "शो'चं सूत्रसंचालन मी करणार हे पक्कं ठरल्यानंतर मी आळशीपणा न करता "जिम'मध्ये जायला लागलेय त्याशिवाय माझ्या आगामी चित्रपटांचं शूटिंग हेही एक कारण आहे. मी शाहरूख खानसोबत "डॉन 2' करतेय आणि त्यात मला बरेचसे ऍक्‍शन सिक्वेन्सेस करायचेत. आणि हो, आणखी एक सांगायचं राहिलंच की...
Thursday, September 09, 2010 AT 03:04 AM (IST)
1 2 3 4 5
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: