Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 18
मुंबई  -  स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य केवळ शिक्षणातून रुजत नाही, तर त्याबद्दल गांभीर्याने, सखोल भूमिका घेण्याची व ती भूमिका राबवण्याची गरज असते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार युवराज मोहिते यांच्या "आदिम ते हायटेक' या डॉक्‍युमेंटरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांचा परामर्श घेताना सुप्रिया सुळे यांनी, महिलांवरील कोणताही अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जव्हार- मोखाड्यासारख्या आदिवासी भागांमध्ये आज खूप वेगाने शहरी संस्कृतीचे आक्रमण होत आहे. आदिवासींवर आदळणारे "हायटेक कल्चर' तर दुसरीकडे शहरांतील चौकटीतले जगणे झिडकारून "व्यक्त' होण्यासाठी या भागामध्ये "भोग' शोधणारी शहरांतील कित्येक माणसे, या साऱ्यांच्या दुष्टचक्रात भरडल्या गेलेल्या आदिवासी महिलेवरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या लघुपटाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
Sunday, September 05, 2010 AT 10:23 AM (IST)
पिंपरी -  चांगली जागा, अद्ययावत तंत्रज्ञान आदी सुविधा असूनही केंद्र सरकारची हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनी तोट्यात गेली, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. कामगार आणि व्यवस्थापनाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास कंपनी आर्थिक डबघाईतून यशस्वीपणे बाहेर पडेल. कंपनीची जमीन विकण्यापेक्षा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर तिचा विकास करावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केले. 'एचए' कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न आणि कंपनीची स्थिती जाणून घेण्यासाठी सुळे यांनी कंपनीस भेट दिली. त्यानंतर अधिकारी आणि कामगार प्रतिनिधींपुढे त्या बोलत होत्या. कंपनीचे महाव्यवस्थापक के. पी. राजन, संचालक (वित्त) ए. एस. वैद्य, सरव्यवस्थापक डॉ. ए. एन. झा, कार्मिक व्यवस्थापक टी. दास, एच. ए. मजदूर संघाचे सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आझमभाई पानसरे, आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे उपस्थित होते. या वेळी सुळे यांना "एचए' मजदूर संघाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. त्यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'एचए' ही देशातील महत्त्वाची कंपनी आहे.
Friday, September 03, 2010 AT 12:00 PM (IST)
पिंपरी -  पालकांना विश्‍वासात घेऊनच शाळांना शुल्कवाढ करावी लागेल. पालक, शिक्षक संघ आणि व्यवस्थापन एकत्र बसून शुल्कवाढीबाबत निर्णय घेऊ शकते, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एच.ए.) कंपनीला सुळे यांनी भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासगी विनाअनुदानित शाळांच्या शुल्क निश्‍चितीसाठी सरकारने काढलेले तीन अध्यादेश (जीआर) उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 1) रद्द केले. या अध्यादेशानुसार आता सरकारला शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवता येणार नाही. या संदर्भात सुळे म्हणाल्या, 'शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांचे काम चांगले आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असे कोणतेही काम सरकार करणार नाही. शिक्षणात राजकारण चालत नाही. भावी पिढीचे सर्व आयुष्य शिक्षणावर अवलंबून असते. त्यासाठी शिक्षण खाते अधिक सक्षम असणे गरजेचे आहे.''
Friday, September 03, 2010 AT 10:45 AM (IST)
कोथरूड -  बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण आत्मसात करणाराच यापुढील काळामध्ये यशस्वी होणार आहे. तसेच युवा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी आधुनिक शिक्षण गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. प्रगतीपथ एज्युकेशनल फाउंडेशनच्या मिलेनियम स्कूलमध्ये "ई-शाळा' प्रकल्पाचे उद्‌घाटन सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी आमदार रमेश वांजळे, राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या विजयशीला सरदेसाई, महापालिका आयुक्त महेश झगडे, मिलेनियम स्कूलचे संचालक सुधीर पाठक, लक्ष्मीकांत खाबीया आदी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ""शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे नाव आहे. जगामध्ये सध्या युवा पिढीला अधिक महत्त्व दिले जात आहे. रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी शिक्षण आवश्‍यक आहे. आधुनिक जगामध्ये पात्रता सिद्ध करावयाची असेल तर बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षण घेण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक शिक्षण संस्थांनी अपंग, मूकबधिर मुलांसाठी राखीव जागा ठेवून त्यांना सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळून शिक्षण दिल्यास त्या मुलांची प्रगती होईल.
Tuesday, August 31, 2010 AT 09:45 AM (IST)
पुणे -  "चारकोल' आणि "ड्राय पेस्ट' या मिश्र माध्यमातून के. केशव राव यांनी चितारलेल्या चित्रांतून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी महात्मा गांधी यांच्या जीवन संघर्षाचा वेध घेणाऱ्या "बापू' या चित्रप्रदर्शनास शुक्रवारपासून सुरवात झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. "आर्ट टुडे गॅलरी'तर्फे गोळीबार मैदान चौक येथील कलादालनात हैदराबाद येथील चित्रकार केशव राव यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमास गॅलरीचे संचालक सुधाकर चव्हाण, प्रसिद्ध चित्रकार प्रा. सुभाष पवार, भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. बनकर, गॅलरीच्या प्रिया पवार आणि संजीव पवार उपस्थित होते. गुरुवारपर्यंत (ता. 19) दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. सुळे म्हणाल्या, ""चारकोल आणि ड्राय पेस्ट या पारंपरिक माध्यमाचा वापर करून चित्रकला ही सध्याच्या काळात दुर्मिळ झाली असून, त्याचा उत्तम आविष्कार या प्रदर्शनातून पाहावयास मिळत आहे.
Saturday, August 14, 2010 AT 09:30 AM (IST)
1 2 3 4
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: