Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 32
लालबागचा राजा म्हणजे भाविकांचा लाडका बाप्पा...नवसाला पावणारा देव अशी त्याची श्रद्धा...दरवर्षी राजाचं दर्शन घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळं रांगेत उभं राहणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी यंदा आधुनिक सोयीसुविधा करण्यात आल्यात.   व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.
Thursday, September 09, 2010 AT 10:00 AM (IST)
परभणी -  जिल्हा रुग्णालयासह स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांच्या सोयीसुविधांत वाढ करण्यासाठी मराठवाडा पॅकेजअंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाने 51 कोटी 83 लाख 20 हजार रुपयांचा नवीन प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयाच्या खाटांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्याचबरोबर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तज्ज्ञांची कमतरता येथे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक असुविधांनी जिल्हा रुग्णालय त्रस्त आहे. त्यामुळे रुग्णांची मोठीच गैरसोय होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा पॅकेजअंतर्गत जिल्हा रुग्णालयांनी नवीन प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हा रुग्णालयातच नवीन 160 खाटांचे बांधकाम करणे गरजेचे आहे. 20 खाटांचा अपघात कक्ष, 20 खाटांचा शुश्रुषा कक्ष, 40 खाटांचा आपत्कालीन कक्ष व 80 खाटांच्या संसर्गजन्य कक्षाचा समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या शनिवार बाजाराजवळील स्त्री रुग्णालयाची खाटांची संख्या सध्या 60 आहे. तीत नवीन 100 खाटांची वाढ करण्याची आवश्‍यकता या प्रस्तावात देण्यात आली आहे.
Wednesday, September 01, 2010 AT 09:45 AM (IST)
उस्मानाबाद -  दलित वस्तीमधील विविध विकासकामांची पूर्तता करावी, या मागणीसाठी सहा सप्टेंबर रोजी महिला बचतगटाच्या वतीने पालिकेवर लोटा मोर्चा काढण्यात येणार आहे. रसुलपुरा, भीमनगर, बौद्धनगर, अजिंठानगर या दलित वस्तीमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या भागांतील विकासकामे पूर्ण करावीत, अशी तेथील नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी या संदर्भात पालिकेला निवेदनही दिले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालय ते वैरागरोडपर्यंत नऊ लाख रुपये खर्चाचे हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याचे पालिकेने लेखी कळविले आहे. या चारही भागांतील रस्ते, नाल्यांची कामे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात येतील, असे पालिकेने कळविले आहे. असे असले तरी महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट आहे. स्वच्छतागृहांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, त्याची चौकशी करावी. स्वच्छतागृहाच्या परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य आहे. झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे.
Wednesday, September 01, 2010 AT 09:30 AM (IST)
मुंबई -  तुरुंगवास भोगणाऱ्या कैद्यांना मिळणारे घरचे जेवण, फळे, मिष्टान्न व मनोरंजनाच्या सुविधा लवकरच गुंडाळण्यात येणार आहेत. ऑर्थर रोड कारागृहात बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारा दाऊदचा साथीदार मुस्तफा डोसा आणि कुख्यात गुन्हेगार अबू सालेम यांना न्यायालयाच्या निर्देशांच्या नावाखाली मिळणाऱ्या पंचतारांकित सुविधांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात येणार आहे. कैद्यांना रास्त नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्देशांचा न्यायालयाने पुनर्विचार करावा अन्यथा सरकार अपिलात जाईल, अशी माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ' ला दिली. मार्च -93 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगणारा कुख्यात गुन्हेगार मुस्तफा डोसाने त्याचा एकेकाळचा साथीदार अबू सालेमवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी ऑर्थर रोड तुरुंगाची पाहणी केली. या पाहणीत बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना न्यायालयाच्या निर्देशाच्या नावाखाली पंचतारांकित सुविधा दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.
Tuesday, August 24, 2010 AT 09:45 AM (IST)
मुंबई -  लोअर परळ येथे श्रीनिवास मिलच्या भूखंडावर लोढा बिल्डर्सने 117 मजली इमारत बांधण्याचे जाहीर केले आहे. उत्तुंग इमारती बांधताना लगतच्या रहिवाशांना पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सेवा-सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे अशा इमारतींना "आयओडी' देताना विचार करावा, अशी सूचना महापौर श्रद्धा जाधव यांनी प्रशासनाला केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ना. म. जोशी मार्ग, करी रोड, लोअर परळ, प्रभादेवी, वरळी, एल्फिन्स्टन आदी भागात मोठ्या प्रमाणात उत्तुंग इमारती उभ्या रहात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरी सुविधांवर ताण पडत असताना तेथे पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत नागरी सुविधांमध्ये कोणतीही वाढ करण्यात झालेली नाही. अरुंद रस्त्यांमुळे आणि वाढलेल्या रहदारीमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक मंडळे, चाळी, संस्था आणि सोसायट्यांनी अशा उत्तुंग इमारतींना विरोध केला आहे.
Tuesday, August 17, 2010 AT 09:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: