|
|
|
|
|
|
नागपूर -  सोयाबीन बियाण्यांची विक्री करणाऱ्या पंधरा कंपन्यांवर राज्य सरकारने बंदी घातली. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असता सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या हवी तशी खरेदी सुरू झालेली नसल्याने बियाणे उपलब्ध आहेत. परंतु, मागणी वाढल्यानंतर साठेबाजाकडून सोयाबीन बियाण्यांच्या काळ्या बाजाराची शक्यता व्यक्त केली जाते. नागपूर जिल्ह्यात सोयाबीन पेरणीचा कल कायम आहे. बी-बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गडचिरोली -  गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला आहे. हिंसक कारवायांमुळे व राजकीय नेत्यांच्या अपहरणाच्या घटनांमुळे नागरिकांत प्रचंड दहशत पसरली असतानाच माओवाद्यांनी बुधवारी (ता. 16) पुकारलेल्या भारत बंदचा दुर्गम भागात काहीसा प्रभाव जाणवला. पोलिस ठाणे असलेल्या गावातही बाजारपेठ कडकडीत बंद ठेवल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय एसटी बसेस व खासगी वाहनेही बंद होती.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचारी व शिक्षकांच्या बदल्यांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने 12 जूनपर्यंत "जैसे थे'चा आदेश दिला. त्यामुळे काही शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे तर काही नाराज झालेत.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सभेसाठी प्रचारसाहित्य घेऊन जाणाऱ्या गाडीवर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. ही घटना महाल भागातील अण्णांची जाहीर सभा असलेल्या चिटणीस पार्क परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी युवक कॉंग्रेसचे नेते कुणाल राऊत यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले, की हजारे यांच्या सभेसाठी साहित्य घेऊन जाणारी जीप (क्र.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गडचिरोली, गोंदिया -  'भारत बंद'ची घोषणा अमलात आणण्यासाठी माओवाद्यांनी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत चांगलाच हैदोस माजविला. गडचिरोलीत जिल्ह्यात खासगी बससह चार वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात बीएसएनएलचे टॉवर तसेच टोयागोंदी ग्रामपंचायतीचे कार्यालय जाळल्याच्या घटना घडल्या. गडचिरोच्या दुर्गम भागातील जनजीवनावर बंदचा परिणाम स्पष्टपणे जाणवत होता.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जिमलगट्टा -  तेंदूपाने तोडणाऱ्या बापलेकीवर अस्वलाने हल्ला केल्याने मुलीचे प्राण वाचविण्यासाठी अस्वलाशी झुंजणाऱ्या वडिलांचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी (ता. 15) सकाळी उमानूर परिसरातील जंगलात घडली. श्यामराव लचमा सिडाम (वय 48) असे मृताचे नाव आहे. श्यामराव व त्यांची मुलगी सुमन तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, सुमनवर अचानक अस्वलाने हल्ला केला. मुलीचा आवाज ऐकून श्यामरावाने अस्वलाशी झुंज दिली.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गडचिरोली -  वीज वितरण कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे बुधवारी (ता. 16) महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अमरावती -  विद्यापीठ मार्गावरील महापौर बंगल्याच्या परिसरामध्ये मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यात तब्बल 19 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन परप्रांतीय युवकांसह चौघांना पोलिसांनी अटक केली. बंगल्याचा रखवालदार मात्र कारवाई सुरू असताना पसार झाला. या घटनेने शहरात तसेच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. महापौरांच्या या बंगल्याची नुकतीच डागडुजी झाली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ग्रंथारंभी संजीवनी विद्येचे प्रणेते, दैत्यांचे गुरू शुक्राचार्य आणि त्यानंतर देवांचे गुरू बृहस्पती यांना वंदन करून, आर्य चाणक्यांनी कौटिलीय अर्थशास्त्राची रचना केलेली आहे. आजच्या वैचारिकतेला साक्षी ठेवून "प्रथम वन्दे दुर्जनम् तदनंतरम् सज्जनम्' अशा धारणेने या ग्रंथाची सिद्धता केली की काय? असल्या गहन संभ्रमात सर्वसाधारण वाचक पडण्याची शक्यता आहे. परंतु, तसला आचार किंवा विचार या ग्रंथात नाही.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
चंद्रपूर -  सहावी ते बारावीदरम्यान शिकत असलेल्या शाळकरी मुलींमधील रक्तक्षयाचे सर्वेक्षण आणि त्यानुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा पॅटर्न आता राज्यभर राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर परिसरातील सर्वेक्षणातून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनंतर आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला. रक्तात लालपेशींचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे म्हणजेच "ऍनेमिया' असल्याचे समजण्यात येते.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत 94 बियाण्यांचे नमुने नापास करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेला 1 हजार 555 बियाण्यांचे नमुने प्राप्त झाले. त्यातील 1 हजार 341 बियाण्यांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित 214 बियाणे तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बीज परीक्षण अधिकारी एस. बी. मंडपे यांनी दिली. राज्य सरकारने बियाणे कायदा 1961 अंतर्गत राज्यात पुणे, परभणी आणि नागपूर अशा तीन ठिकाणी बीज परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्या.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  शहरातील अनधिकृत व अविकसित भूखंड नियमित करण्यासाठी 16 रुपये चौरस फूट याप्रमाणे जो विकासशुल्क आकारला जात होता, तो आता 60 ते 120 रुपये चौरस फुटाप्रमाणे आकारला जाणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नुकतेच 10 मे रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या वाढीव प्रस्तावास मंजुरी दिली. सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने विकासशुल्क 60 ते 120 रुपये चौरस फूट वाढविण्याचा प्रस्ताव 26 नोव्हेंबर 2011 रोजी शासनाकडे पाठविला.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागांमध्ये प्राध्यापक जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर दहा महिन्यांपासून त्या भरल्या गेल्या नाहीत. हायकोर्टाने नुकतीच स्थगिती हटविल्यानंतर नियुक्त्यांबाबत "सिलेक्शन पॅनल' तयार करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मंजुरी आवश्यक असताना बैठकच अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्याने त्या नियुक्त्या रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
देसाईगंज -  राज्य शासनाने यापूर्वीचा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मध्ये विलीन करून राज्यात पाच ऑगस्ट 2011 पासून नवीन कायदा अमलात आणला आहे. जिल्ह्यातील सर्वच अन्नपदार्थांसोबत संबंधित व्यावसायिकांनी या कायद्यान्वये आपला परवाना किंवा नाव नोंदविणे सक्तीचे केले असून, याबाबत जिल्ह्यातील अन्न व्यावसायिक उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर -  वाढती महागाई, पाण्याचे दुर्भिक्ष, पेट्रोलच्या संभाव्य वाढीचे चटके सहन करणाऱ्या वैदर्भींना येत्या दोन दिवसांत कडक उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. आज पाऱ्याने जवळपास 45 अंशांची पातळी गाठली असून त्यात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यंदा तपमानाने 45 अंशाची पातळी गाठली नसली तरीही येत्या दोन दिवसांत हा अनुभव येऊ शकतो. बुधवारी सर्वाधिक तपमानाची नोंद वर्धा आणि चंद्रपूर येथे 44.9 अंश सेल्सिअस एवढी झाली.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|