|
|
|
|
|
|
लंडन - बराक ओबामा यांच्याशी घटस्फोट घेण्याचा मिशेल यांचा बारा वर्षांपूर्वी विचार होता, असा सनसनाटी दावा एका एडवर्ड क्लेन लिखित "द ऍमॅच्युअर' या पुस्तकात केला आहे. "शिकागोची निवडणूक लढविण्यास मिशेल यांनी ओबामा यांना विरोध केला होता. हा विरोध ओबामा यांनी दुर्लक्षित केला. त्यानंतर मिशेल यांनी घटस्फोटाचा विचार केला होता. हे समजल्यामुळे ओबामा कमालीचे निराश झाले. ते आत्महत्या करतील, अशी भीतीही जवळच्या मित्रांना वाटत होती,' असे पुस्तकात म्हटले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वॉशिंग्टन -  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार छोटा शकील आणि टायगर मेननवर अमेरिकेने निर्बंध लावले आहेत. त्यांच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. अमेरिकन वित्त विभागाच्या विदेशी संपत्ती नियंत्रण कार्यालयाने हे निर्बंध लावले आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अथेन्स - विद्यमान सरकारला देशाला आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर काढता न आल्याने आता ग्रीसमध्ये पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. ग्रीसला नुकतेच सहा मे रोजी निवडणूक झाली होती. मात्र आता पुन्हा नव्याने एक महिन्यात निवडणुकीला जावे लागणार असल्याची माहिती अध्यक्ष कारोलोस पापुलिओस यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे युरोपीयन समुदायातील आपला हिस्साही त्यांनी मागे घेतला असून देशाच्या विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पॅरिस - फ्रान्सच्या अध्यक्षची सूत्रे आज समाजवादी पक्षाचे नेते फ्रान्स्वा ओलॉंद यांनी स्वीकारली. शतकातील पहिले समाजवादी अध्यक्ष म्हणून ओलॉंद यांची नोंद झाली. समाजवादी नेते फ्रान्स्वा मिट्रॅड हे 1995 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर अध्यक्षपदी विराजमान होणार ओलॉंद पहिले समाजवादी नेते आहेत. ऑलॉंद हे फ्रान्सचे 24 वे अध्यक्ष आहेत. इलायसी पॅलेस या अध्यक्षीय निवासस्थानी दिमाखदार शपथविधी सोहळा झाला. सोहळ्याला 400 निमंत्रित उपस्थित होते.
Wednesday, May 16, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वॉशिंग्टन - अमेरिकेत तीन माणसांमागे एक माणूस झोपेमध्ये चालतो असे अभ्यासात पुढे आले आहे. प्रचंड नैराश्य आणि झोपेसंबंधीच्या तक्रारींमध्ये वाढ खूप वाढ झाल्याचे हा अभ्यास सांगतो. अहवाल काय सांगतो...? - 15 राज्यांतील 16 हजार प्रौढांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. - 16 हजारपैकी 29 टक्के लोकांनी सांगितले की आयुष्यात एकदा तरी ते झोपेत चालले आहेत. - 3 टक्के लोक वर्षातून आणि महिन्यातून एकदा झोपेत चालले.
Wednesday, May 16, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इस्लामाबाद - पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना "नाटो'ने शिकागो परिषदेसाठी निमंत्रित केले. "नाटो'चे सरचिटणीस रॅसमुसेन यांनी झरदारी यांना दूरध्वनीवरून परिषदेचे निमंत्रण दिले. या महिन्यात अमेरिकेतील शिकागो येथे "नाटो'ची 20 वी परिषद होत आहे. झरदारी यांना परिषदेचे बिनशर्त निमंत्रण दिल्याचे झरादारी यांचे प्रवक्ते फरहातुल्ला बाबर यांनी सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये "नाटो'च्या हल्ल्यात 24 पाकिस्तानात सैनिक ठार झाले होते.
Wednesday, May 16, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये वॉल-मार्ट स्टोअरमध्ये एका ग्राहकाला साप चावल्याची घटना घडली आहे. 47 वर्षे वयाचे मिका क्रेग शॉपिंग करत असताना त्यांच्यावर रॅटल-स्नेकने झडप घेऊन चावा घेतला. त्यांच्या हातावर गंभीर सूज आल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. झालेल्या घटनेबद्दल माफी मागत स्टोअरमध्ये साप कसा आला, याची तपासणी सुरू असल्याचे वॉल-मार्टने म्हटले आहे. साप किमान एक फूट लांबीचा असल्याचे एका ग्राहकाने सांगितले.
Wednesday, May 16, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बीजिंग / लंडन - तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या भेटीला चीनने तीव्र आक्षेप घेतला. चीनचे परराष्ट्रमंत्री त्सॉंग टाऊ यांनी ब्रिटनचे राजदूत सेबस्टेन वूड यांच्याकडे भेटीविषयी आक्षेप नोंदवला. ही भेट चीनच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणारी असल्याचे टाऊ यांनी म्हटले आहे. मात्र, ब्रिटनकडून या भेटीचे समर्थन करण्यात आले. ही भेट खासगी स्वरूपाची असल्याची खुलासावजा प्रतिक्रिया ब्रिटनच्या वतीने देण्यात आली.
Wednesday, May 16, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काठमांडू (नेपाळ) - येत्या 27 मेपर्यंत नेपाळमध्ये नवी राज्यघटना कार्यन्वित होणार असून त्यात संघराज्य पद्धतीचा स्वीकार करण्यात येणार आहे. नव्या घटनेनुसार देशात अकरा संघ राज्ये स्थापन करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी संघराज्य पद्धती आणि मिश्र राजकीय व्यवस्थेला संमती दिली. तर अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक घेण्याला पक्षांनी सहमती दर्शविली. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर घटनेवर शिक्कामोर्तब झाले.
Wednesday, May 16, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रशिया - रशियाच्या सोयुज आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून आज दोन रशियाचे आणि एका अमेरिकाच्या आंतरराळविरांनी अवकाशात उड्डान केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी आठ वाजून 31 मिनीटांनी कझाकस्तानच्या सोयुज आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून हे उड्डान करण्यात आले. आजच्या या उड्डानात नासाचे आंतराळवीर जोसेफ अक्बा, गॅन्डी पडलका आणि सेरजी रेविन अशी आहेत. या उड्डानानंतर तीन मिनिटांनी या आंतरराळवीरांनी कॅमेराकडे बघत एकमेकांना खूण केली.
Wednesday, May 16, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांची जगातील सर्वांत सामर्थ्यवान आईच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे. 20 जणींच्या या यादीत पेप्सीकोच्या सचिव इंद्रा नुयी यांची तिसऱ्या क्रमांकावर तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सहाव्या क्रमांकावर निवड झाली आहे. ही यादी जागतिक मातृ दिनानिमित्त फोर्ब्ज मासिकाने जाहीर केली. राजकारण, उद्योग, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील महिलांची यात निवड करण्यात आली.
Tuesday, May 15, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इस्लामाबाद - 2008 सालच्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केलेले भारतीय सैन्य कमी केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या 8 एप्रिलच्या दिल्ली भेटीमध्ये दोन देशांमध्ये या विषयावर परस्पर सहमती झाल्याचे कळते आहे. "द एक्स्प्रेस ट्रिब्युन'ने ही बातमी दिली आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर हे वृत्त दिल्याचे म्हटले आहे.
Tuesday, May 15, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ऑस्ट्रिया - एका जुन्या लायका कॅमेराचा लिलाव 14 कोटी 93 लाख रुपयांना (21.6 लाख युरो) झाला आहे. आजवर कुठल्याही कॅमेऱ्यासाठी लागलेली ही सर्वांत मोठी बोली आहे. कॅमेरा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये एका अज्ञात व्यक्तीने खरेदी केला आहे. लायका कॅमेराचा इतिहास - - लायका हा 1923 सालच्या सुरवातीला बनलेल्या 25 कॅमेऱ्यांपैकी एक आहे. - हा पहिला व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी कॅमेरा आहे, जो 35 एमएम फिल्मसाठी वापरला होता.
Tuesday, May 15, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काठमांडू -  उत्तर नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात 15 लोक ठार झाले आहेत. ज्यामध्ये दोन नेपाळी वैमानिक आणि 13 भारतीयांचा समावेश आहे. वैमानिक प्रभू शरण पाठक, सह वैमानिक जे.डी महाजन यांचे शव मिळाले आहे. 'अग्नी एअर' हे विमान पोखराकडून जोमसोमकडे चालले होते.   जोमसोमजवळ तिबेटच्या सीमेपाशी मुक्तिनाथ मंदीर आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक मुक्तिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जात असतात. विमानात एकूण 21 लोक होते. त्यातले 6 लोक वाचले आहेत.
Tuesday, May 15, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लंडन - तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचा आज टेंपलटन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि 11 लाख पौंड असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारातील नऊ लाख पौंड भारतातील "सेव्ह द चिल्ड्रन फंड'ला, सव्वा लाख पौंड अमेरिकेतील "द माइंड्स अंड लाइफ इन्स्टिट्यूट'ला आणि उर्वरित रक्कम तिबेटमधील बौद्ध भिक्खूंच्या विज्ञानशिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दलाई लामा यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केली.
Tuesday, May 15, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|