Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


पश्चिम महाराष्ट्र
सांगली - जिल्ह्यातील 104 ग्रामपंचायतीतील 1.16 कोटी रुपयांच्या अपहाराबद्दल 123 ग्रामसेवकांना दोषी ठरले आहेत. यापैकी 25 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे, तर 60 ग्रामसेवकांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत. ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध योजनांचे अनुदान व जमा झालेल्या रकमांमध्ये ग्रामसेवकांनी हा अपहार केला आहे. ग्रामपंचायतीतील अपहाराबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. मात्र त्यांच्या चौकशीकडे दुर्लक्ष झाले होते.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

कोल्हापूर - कसबा बावड्यात मंगळवारी रात्री झालेल्या दोन गटांतील मारामारी प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह दहा जणांना अटक केली. त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. मंगळवारी रात्री कसबा बावड्यात रणदिवे गल्लीत जाम बॉईज व विश्‍वशांती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांत मारामारी झाली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तरीही पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

कोल्हापूर - बिथरलेल्या हत्तिणीने काल शहरात घातलेल्या गोंधळाबद्दल येथील चंद्रप्रभा दिगंबर जैन कासार मंदिर ट्रस्टचे सुभाष पोकळे व अन्य संचालक आणि हत्तिणीचा माहुत यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार पेठेतील जैन मंदिरात उत्सवासाठी बेडकिहाळ येथून उषाराणी नावाची हत्तीण आणली होती. काल दुपारी उंटाच्या आवाजाने ती बिथरली व शहरभर पळत सुटली.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

कोल्हापूर - विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनाच्या निमित्ताने शाळांचीच खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू झाली असून, कोल्हापूर विभागातील सुमारे अडीचशे शाळांच्या मूल्यांकनाची उलटतपासणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शाळांच्या नावातील "कायम' शब्द शासनाने काढून टाकल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मूल्यांकनाची तपासणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

कोल्हापूर - उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचे हत्यार आता उपसले जाणार आहे. त्याबाबतचा राज्य शासनाचा आदेश शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला आज मिळाला आणि प्रशासनाने ताबडतोब प्राचार्यांना नोटिसा पाठविल्या. त्याबाबतची माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी "सकाळ'ला दिली. विद्यापीठ कायद्यानुसार संबंधित प्राध्यापकांवर कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

सातारा - राज्यातील सर्व ग्रंथालयांची पडताळणी होणार असल्याने अनियमित असलेल्या सर्व ग्रंथालय चालकांचे धाबे दणाणले आहेत. ग्रंथालयांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयात असणारे निरीक्षकाचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे दोन वर्षे जिल्ह्यातील ग्रंथालयांची तपासणी झालेली नाही. शासनस्तरावरूनही ग्रंथालयांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

जोतिबा डोंगर - साम टीव्हीवर "जोतिबाच्या नावानं चांगभलं' ही विशेष मालिका जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेवर आधारित प्रश्‍नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली होती. याची सोडत काढण्यात आली. यामध्ये पुणे येथील स्वाती करांडे साताऱ्याचे शिवाजी जाधव, होनेवाडी (आजरा, जि. कोल्हापूर) सचिन पाटील महाविजेते ठरले. स्पर्धेतील विजेत्यांची सोडत भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जखिनपेठ (ता. भुदरगड) या गावात काढण्यात आली.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

कऱ्हाड - शहरातील वाहतुकीच्या कोंडीबाबत पोलिस व जनतेत समन्वय साधून योग्य पर्याय शोधण्याची भूमिका घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात स्थापन झालेल्या वाहतूक सल्लागार समितीचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिले आहे. निवडीनंतर सदस्यांना केवळ पत्रे पोचली आहेत. त्या व्यतिरिक्त समितीची तीन वर्षांत एकही बैठक झालेली नाही.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

महाबळेश्‍वर - देशातील सर्वांत उंच म्हणून "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झालेला येथील शासकीय दुग्धशाळेतील निवडुंग सध्या कळ्या- फुलांनी बहरला आहे. त्याचे सौंदर्य न्याहळण्यासाठी तेथे गर्दी होऊ लागली आहे. शासकीय दुग्धशाळेचे तत्कालीन व्यवस्थापक हणमंतराव नलवडे यांनी आपला बागबगीचाचा छंद जोपासत तेथीलच विश्रागृहालगत निवडुंगाचे रोप लावले.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

कोल्हापूर - येथील आयआयटी क्षेत्रातील अग्रगण्य विजेता अकादमीला यंदाचा एज्युकेशन एक्‍सलन्स 2012 पुरस्काराने गौरविण्यात आले. युनेस्कोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तीन संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यात विजेता अकादमीचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र (युनेस्को) संघाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अलीशेर उमारोव यांच्या हस्ते आयआयटी, दिल्ली येथे शानदार समारंभात पुरस्कार वितरण झाले. "विजेता अकादमी'चे संचालक जयंत पाटील व सौ.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

इचलकरंजी - शहरातील काविळीची साथ रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असतानाच आज महंमदअली बाबालाल शेख (वय 47) या विक्रमनगरमधील नागरिकाचा मत्यू झाला. त्यामुळे प्रशासन हाय अलर्ट झाले आहे. आज शहरातील पाच ठिकाणी स्वत: मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी भेटी देऊन पाण्याचे नमुने तपासले. आयजीएम रुग्णालयात आजअखेर 52 रुग्ण दाखल झाले आहेत. शहरात आज सर्वेक्षणादरम्यान सुमारे तीन हजार कुटुंबामध्ये काविळीचे 84 रुग्ण आढळून आले आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

नगर - बदली थांबविण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयाने केलेल्या 169 प्रमाणपत्रांच्या तपासणीत 25 प्रमाणपत्रांचे रेकॉर्डच सापडले नाही. तसेच सहा प्रमाणपत्रे बनावट आढळली आहेत. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

संगमनेर - छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन संघर्षमय आहे. अवघ्या 32 वर्षे वयात त्यांनी साडेतेराशे लढाया केल्या व जिंकल्या. एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. शत्रूशी त्यांनी कधीच तह केला नाही. रयतेच्या व स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी अत्युच्च त्याग केला. त्यांचा त्याग व बलिदानापासून आपण धडा घेतला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमंत कोकाटे यांनी केले. महापुरुष जीवन संदेश अभियानात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तळेगाव दिघे (ता.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

नगर - आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टने जिल्ह्यातील साहित्य रसिकता वाढावी, तसेच उदयोन्मुख साहित्यिकांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी छोटेखानी पाच साहित्य संमेलने भरविण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमातील पहिले काव्यसंमेलन येत्या रविवारी (ता. 22) दुपारी साडेतीन वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात होणार आहे. "आनंदोत्सव'ने काव्य, कथात्म साहित्य, नाट्य, वैचारिक साहित्य व ललित गद्य वाङ्‌मय या पाच विषयांवर छोटेखानी संमेलनांचे नियोजन केले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

कोपरगाव - शिर्डीच्या साईबाबा संस्थानने तालुक्‍यातील येसगाव येथील भक्‍तनिवासाच्या जागेचा ताबा न घेता, मोजणी न करता अतिक्रमित जागेवर केलेले भक्‍तनिवासाचे बांधकाम नियमित करण्यासाठी कोपरगावच्या तहसीलदारांनी 9 लाख 66 हजार रुपये आणि त्यावरील व्याजाचा दंड संस्थानला केला आहे. संस्थानने हे बांधकाम नियमित करून दंड-व्याजाची रक्‍कम माफ करावी, अशी मागणी केली आहे. या प्रश्‍नावर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पाठपुरावा केला.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: